🎨 कला, चित्रकलेचे वाढीव गुण मिळणार*
By pudhari | Publish Date: Mar 26 2017
मुंबई : प्रतिनिधी
येत्या शैक्षणिक वर्षापासून कला, चित्रकला या क्षेत्रात प्रावीण्य मिळविणार्या व लोककला प्रकारात सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना मार्च 2017 पासून होणार्या दहावी परीक्षेमध्ये 15 ते 25 वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.
विधान परिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत वाढीव गुणांची सवलत देण्याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
शासनाने आता क्रीडा क्षेत्राबरोबरच शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलेत प्राण्यि मिळविणार्या तसेच लोककला प्रकारात सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळांत परीक्षेत हे गुण मिळणार आहेत. याची अंमलबजावणी शालेय शिक्षणविभागाला करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहेे. अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी उत्तरात दिली आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃
📱 *मोबाइल नंबरला हवा ‘आधार'*
Maharashtra Times | Updated Mar 26, 2017
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्राप्तिकर विवरण पत्र आणि पॅनकार्डसाठी आधार कार्ड बंधनकारक केल्यानंतर केंद्र सरकार आता मोबाइल क्रमांकासाठीही आधार कार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्रालयाने सर्व मोबाइल सेवा पुरवठादारांना नोटीस धाडली आहे. कंपन्यांच्या सर्व मोबाइल ग्राहकांचे (प्रीपेड अथवा पोस्टपेड) ई-केवायसी तपासण्याविषयी नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
ई-केवायसीसाठी कंपन्यांना ६ फेब्रुवारी २०१८पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ई-व्हेरिफिकेशनसाठी मोबाइल सेवा पुरवठादारांकडून संकेतांक पाठविण्यात येईल. तो दाखवल्यानंतर तपासणी प्रक्रिया सुरू होईल. या तपासणीसाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागणार आहे. या प्रक्रियेदरम्यान संबंधित ग्राहकाने आधार कार्डचा क्रमांक न सांगितल्यास त्वरित त्याचा कार्यरत मोबाइल क्रमांक बंद करण्यात येणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व मोबाइल क्रमांकाची आधार कार्डशी पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार देशभरातील सर्व मोबाइल क्रमांक आधार कार्डला जोडण्याचे आदेश दूरसंचार विभागाने संबंधित मोबाइल सेवा पुरवठादारांना दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधार कार्डची सेवा देणाऱ्या ‘यूआयडीएआय’, ट्राय आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी मोबाइल क्रमांकाच्या आधार जोडणीच्या प्रक्रियेसंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेची माहिती देशभरात प्रसारित करण्यासाठी लवकरच जाहिरातींची मदत घेतली जाणार आहे. या जाहिरातींतून सरकारच्या उद्देशाची आणि मोबाइल क्रमांक आधारला जोडण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃
🎯 _*विदेशातील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती*_
_*Govt. Scheme*_
विदेशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी अथवा पीएचडी करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयातर्फे 2016-17 वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष शिष्यवृत्तींसाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडूनअर्ज मागविण्यात येत आहेत.
_*विषयानुसार शिष्यवृत्ती*_
👉 अभियांत्रिकी व व्यवस्थापन - 32
👉 विज्ञान आणि अप्लाइड सायन्स - 18
👉 कृषी विज्ञान व वैद्यकशास्त्र - 17
👉 आंतरराष्ट्रीय वाणिज्य, लेखा व अर्थशास्त्र - 17
👉 मानवीय शास्त्र, सामाजिक विज्ञान, फाइन आर्ट्स - 16
_*जागा व आरक्षण*_ : या योजनेअंतर्गत 100 जागा असून त्यापैकी 90 जागा या अनुसूचित जातीच्या, 6 जागा भटक्या- विमुक्त जमातीच्या तर 4 जागा या भूमिहीन वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहेत.
_*आवश्यक पात्रता*_ :
_*पीएचडीसाठी*_ : अर्जदाराने संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत-कमी 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. संशोधनाचा अनुभव आवश्यक.
_*पदव्युत्तर पदवीसाठी*_ : अर्जदाराने संबंधित विषयातील पदवी परीक्षा कमीत-कमी 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अनुभव आवश्यक.
👉 अर्जदार विद्यार्थी इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावा.
👉 त्यांच्या घरचे वार्षिक एकत्रित उत्पन्न 6 लाख रुपयांहून अधिक नसावे.
👉 अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाच्या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी विदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.
_*वयोमर्यादा*_ : दि. 1 एप्रिल 2016 रोजी 35 वर्षापेक्षा अधिक नसावे.
_*शिष्यवृत्तीचा कालावधी*_ : संशोधनपर पीएचडीसाठी 4 वर्षे I पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 3 वर्षे
_*शिष्यवृत्तीची रक्कम*_ :
👉 अमेरिका व इतर देश – 15,400 अमेरिकी डॉलर्सची शैक्षणिक शिष्यवृत्ती व आकस्मिक खर्चापोटी 1,500 अमेरिकन डॉलर्स.
👉 इंग्लंड – 9,900 ग्रेट ब्रिटन पाउंड्सची शैक्षणिक शिष्यवृत्ती व आकस्मिक खर्चापोटी 1,100 ब्रिटन पाउंड्स
🎯 _*अर्ज करण्याची अंतिम तारीख*_ : दि. 31 मार्च 2017
_*अर्ज पाठवण्यासाठी पत्ता*_ : डायरेक्टर, एससीडी- व्ही सेक्शन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अॅण्ड एम्पॉवरमेंट, डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अॅण्ड एम्पॉवरमेंट, रूम नं. 211, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्रप्रसाद मार्ग, नवी दिल्ली- 110001
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃