twitter
rss

🌿कम्प्युटर प्रणाली बनविणार प्रश्नपत्रिका*

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात २०१८ मध्ये फेब्रुवारी- मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयाचा चार संच असणाऱ्या प्रश्नप्रत्रिकांचा वापर होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आता पुढचा निर्णय घेण्याचा तयारीत आहे. या चारही प्रश्नपत्रिका कम्प्युटर प्रणालीद्वारे तयार करण्याचा मंडळ विचार करीत असून त्यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी व प्रश्नपत्रिकेतील मानवी हस्तक्षेप दूर करण्यासाठी हा निर्णय मंडळ घेण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच बारावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या पेपर सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी फुटून व्हॉट्स अॅपवरून व्हायरल होत आहेत. तसेच, परीक्षा केंद्रांवर पेपर फुटण्याचे प्रकार घडत आहेत. या एकंदरीत गोंधळात बारावी आणि दहावीच्या परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकारदेखील आढळून आले आहेत. या सर्वांवर उपाय शोधण्यासाठी मंडळ उपाययोजना आखण्याची तयारी करत आहे. अशातच भारतीय शिक्षण मंडळाद्वारे पश्चिम महाराष्ट्राचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, अध्यक्ष महेश दाबक, नारायण पाटील यांनी पेपररफुटीला आळा घालण्यासाठी काही सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना केल्या होत्या. या सूचनांवर मंडळ आता विचार करत आहे. कुलकर्णी आणि म्हमाणे यांच्यात झालेल्या बैठकीत काही सूचनांना तत्वतः मान्यता मिळाली आहे.
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे काम हे मंडळाने ठरवून दिलेले तज्ज्ञ शिक्षक करत असतात. त्याऐवजी आता शिक्षकांना परीक्षेसाठी प्रत्येक विषयाच्या शास्त्रशुद्ध प्रश्नपेढ्या तयार करायच्या आहेत. त्यानंतर या प्रश्नपेढ्याच्या आधारे संगणकीय प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिकेचे चार संच काढण्यात येतील. या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येईल, अशी चर्चा म्हमाणे यांच्याशी झाली असून त्यांनी याला तत्वतः मान्यता दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे आलेल्या सूचनांचा विचार करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष म्हमाणे यांनी सांगितले आहे.

*मानवी हस्तक्षेप दूर होणार*

दहावी- बारावीच्या परीक्षेसाठी चार संचात प्रश्नपत्रिका काढण्यासाठी उत्तम दर्जाच्या अचूक अशा प्रश्नपेढ्या काढाव्या लागणार आहेत. त्यानुसार प्रश्नपेढ्या काढण्यासाठी शिक्षकांना मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या विशेष कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शिक्षकांना येत्या जून-जुलै महिन्यात देण्यात येणार आहे, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. यामुळे प्रश्नपत्रिकेतील मानवी हस्तक्षेप आणि ढवळाढवळ दूर होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📋 12 वी कॉमर्सचा पेपर पुन्हा फुटला*

By pudhari | Publish Date: Mar 11 2017

मुंबई : प्रतिनिधी

बारावीचा सलग चौथा पेपर शुक्रवारी फुटला. कॉमर्स शाखेचा बुक कीपिंग अँड अकाऊंटन्सीचा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर परीक्षेपूर्वीच उपलब्ध झाला. परीक्षा केंद्रांत मोबाईल बंदी असली तरी पेपरफुटीला मुख्य कारण मोबाईलच असल्याचे मंडळ म्हणते. यावरून पेपरफुटीच्या मालिकेवर मुंबई विभागीय शिक्षण मंडळ फारसे गंभीर नसून, पोलीस तपास करीत आहेत, इतकेच सांगून मंडळ सुस्त बसले आहे.

परीक्षेपूर्वी पहिल्या पंधरा मिनिटात बारावीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होण्याच्या घटना घडत आहेत. असा प्रकार चौथ्यांदा घडला. बुक कींपिग अ‍ॅड अकाऊंटन्सीचा पेपर फुटण्याचा प्रकार कांदिवलीतील डॉ. टी. आर.नरवणे विद्यालयात घडल्याचे स्पष्ट झाले.  नरवणे विद्यालयात दोन विद्यार्थी 11.15 च्या सुुमारास परीक्षेला आले. नेमके त्यांच्याच मोबाईलवर फुटलेली प्रश्‍नपत्रिका होती. कांदिवलीच्या बालभारती हायस्कूलमध्येही  मोबाईलवर प्रश्‍नपत्रिका उपलब्ध असलेला एक विद्यार्थी सापडला. यापूर्वी तीन पेपर फुटल्यानंतर मंडळाने परीक्षा केंद्रात तसेच आवारात केंद्र प्रमुख सोडून अन्य अधिकार्‍यांना तसेच विद्यार्थ्यांना कडक मोबाईल बंदी करुनही पेपर फुटतात कसे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. गेल्या चार दिवसांत 25 हून अधिक शिक्षकांचे मोबाईलही तपासणीअंती जप्त करण्यात आले. मात्र पेपरफुटीचे मूळ कारण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांना विचारले असता अजून तपास चालू आहे, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.

🍃🍂🍃गुरुवर्ष न्यूज🍃🍂🍃

📍‘कॉपीत’ दहावीपेक्षा बारावीच वरचढ!*

By pudhari | Publish Date: Mar 10 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात आतापर्यंत 7 कॉपी प्रकरणे आढळून आली आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा कॉपी प्रकरणात बारावीचे विद्यार्थी पुढे असल्याचे दिसून आले आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 28 फेब्रुवारीपासून बारावी व 7 मार्चपासून दहावीच्या परीक्षेस प्रारंभ झाला आहे. विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने कॉपी प्रकरणे होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली आहेत. विभागीय शिक्षण मंडळाने प्रत्येक जिल्ह्यासाठी भरारी पथके नेमली आहेत. भरारी पथकांकडून कॉपी प्रकरणे पकडली जात आहेत. मात्र, याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत नसल्याने दिसून येत आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान सात कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले आहे. यात इंग्रजी विषय 1 (गारगोटी केंद्र), रसायनशास्त्र-2 व एमसीव्हीसी-1 (गडहिंग्लज केंद्र), इतिहास विषय 3 (फलटण : 2, वडूज : 1) समावेश आहे

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

⛹ थेट राज्यस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंवर ऑब्जेक्‍शन*

- संदीप खांडेकर
03.00 AM

*ग्रेस गुणांची खिरापत - शालेय स्तर खेळाडूंवर अन्यायाची भावना :*
*सकारात्मक निर्णयाची अपेक्षा*

कोल्हापूर - जिल्हा क्रीडा संघटनांकडून जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना ग्रेस गुणांची खिरापत मिळत असल्याने शालेय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याची तक्रार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाकडे जिल्हा संघटनांकडून ग्रेस गुणांसाठीच्या प्रस्तावाचा आकडा शालेय स्तरावरील खेळाडूंपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. जिल्हा क्रीडा संघटनांकडून मात्र जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंनाही ग्रेस गुण मिळावेत, यासाठी हालचाली सुरू असल्याचे संकेत आहेत.

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांत सहभागी खेळाडूंना जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर खेळावे लागते. जिल्हा क्रीडा संघटनांच्या स्पर्धेत विभागाला कात्री देऊन जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर खेळाडू खेळविले जातात. सतरा वर्षांखालील कबड्डी हा क्रीडा प्रकार गृहीत धरून सांगायचे झाल्यास शालेय जिल्हास्तरावरील स्पर्धेनंतर विभाग स्तरीय स्पर्धेसाठी आठ विभागांतून प्रत्येकी बारा याप्रमाणे ९६ खेळाडू खेळतात. यातील पन्नास टक्के दहावी व पन्नास टक्के अन्य वर्गातील खेळाडू धरल्यास केवळ पन्नासभर खेळाडूंनाच ग्रेस मिळतात.

जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचा हा आकडा ४२० होतो. हे सर्व खेळाडू दहावीचे विद्यार्थी असतीलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे त्यातील २१० खेळाडू दहावीचे गृहीत धरल्यास हा आकडा शालेय स्तरावरील खेळाडूंपेक्षा अधिक होतो. जिल्हा संघटनांकडील खेळाडूंचा आकडा दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासाठी डोकेदुखीचा ठरतो. शालेय स्तरावरील खेळाडूंच्या संख्येपेक्षा जिल्हा संघटनांच्या खेळाडूंचा ग्रेस गुणांसाठीचा आकडा मोठा कसा, असा प्रश्‍न मंडळाला पडतो. त्यातूनच जिल्हा क्रीडा संघटनांनी २१ एप्रिल २०१५च्या शासनाच्या परिपत्रकानुसार विभाग स्तरावर स्पर्धा घेणे बंधनकारक आहे.

केवळ ॲथलेटिक्‍स, व्हॉलीबॉल, वुशू स्पर्धा विभागस्तरावर घेतल्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. तसेच संघटनांना राज्य संघटनेस संलग्न असल्याच्या पत्रासह तालुका स्तरावरील ७० टक्के संघटना संलग्नित असल्याची माहिती देणे आवश्‍यक आहे; पण विभागस्तरावर जिल्हा संघटना स्पर्धाच घेत नसल्याने माहिती देणार कोण, हीच अडचण आहे.

*ग्रेस गुणांचे क्रीडा प्रकार*

जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे विविध क्रीडा प्रकारांच्या जिल्हा संघटना ज्या राज्य संघटनांशी संलग्नित आहेत, त्यांची यादी आहे. या क्रीडा प्रकारांचा आकडा एकोणतीस आहे. शालेय स्तरावरील ७१ पैकी ४२ क्रीडा प्रकारांना ग्रेस गुण दिले जातात. त्यामुळे पालक वर्गाने ग्रेस गुण असलेल्या क्रीडा प्रकारांची माहिती घेऊनच पाल्याला त्या त्या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण द्यायला हवे.

*सुधारित ग्रेस गुण असे -*

आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू 25

राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय सहभाग 20

राज्यस्तर पदक सहभाग 15

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃