twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

*👩🏻 जागतिक महिला दिन विशेष 👩🏻*

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣4⃣7⃣

*🐍सर्पदंश झाल्यानंतरही विद्यार्थीनीने दहावीची परीक्षा दिली*

*शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील प्रतिज्ञा सुरेश कांबळे हिचा दहावीचा इंग्रजीचा पेपर होता.*

वार्ताहर, लातूर | March 12, 2017

एखाद्याला सर्पदंश झाला तर बिनविषारी साप असतानाही घाबरून मृत्यू झाल्याच्या घटना आपण अनेक वेळा ऐकतो. मात्र दहावीच्या इंग्रजीच्या परीक्षेच्या दिवशी सकाळी सर्पदंश झाल्यानंतर परीक्षा देण्यासाठी निघालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्या प्रकृतीचा धोका टळल्यानंतर तिने दहावीचा पेपरही दिला.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील प्रतिज्ञा सुरेश कांबळे हिचा आज दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. सकाळी ७.३० च्या सुमारास तिला सर्पदंश झाला. तिच्या परीक्षेचे केंद्र होते चाकूर तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय कबनसांगवी. ती त्या गावी पोहोचली.  मात्र, तेथे तिच्या मत्रिणीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिला चाकूर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले व त्यानंतर लातूरच्या जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले.
या घटनेची माहिती संबंधित शिक्षकांनी लातूर परीक्षा मंडळाचे प्रभारी सचिव गणपत मोरे यांना कळवली. मोरे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला व तिच्या प्रकृतीची चौकशी केली. ती धोक्याबाहेर आहे हे कळल्यानंतर तिला विचारून रुग्णालयातच प्रश्नपत्रिका पाठवून तिला परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. नावाप्रमाणेच प्रतिज्ञा ही ठाम होती. तिने शांतचित्ताने प्रश्नपत्रिका सोडवली. तिच्या या धाडसाचे व परीक्षा मंडळाच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

  - http://guruvarykm.blogspot.in/

   या आपल्या Blog ला भेट द्या.....