twitter
rss

🎋दोषींवर कारवाई परीक्षेनंतरच...*

Maharashtra Times | Updated Mar 14, 2017.

*बारावी पेपरफुटी प्रकरण*

*मुंबई विभागीय मंडळाची घोषणा*

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

बारावी परीक्षेदरम्यान एकामागोमाग एक असे चार पेपर व्हॉट‍्सअॅपवर व्हायरल झाल्याप्रकरणी राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षा संपल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सध्याच्या परीक्षा प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मंडळातर्फे देण्यात आला आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा सध्या मुंबईसह एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत सुरू आहेत. यंदा या परीक्षेत मुंबई विभागातून तब्बल चार प्रश्नपत्रिका व्हॉट‍्सअॅपवर व्हायरल झाल्याच्या प्रकरणाने राज्य मंडळाला बरीच टीका सहन करावी लागली. या परीक्षेदरम्यान मराठी, एसपी, गणित आणि बुक किपिंग या विषयांचे पेपर व्हॉट‍्सअॅपवर व्हायरल झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळाने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सायबर सेल विभागाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत सहा विद्यार्थी आणि विरार येथील मुख्याध्यापकासह लिपीक आणि शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. त्यातच बोर्डानेही या दोषींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही अद्याप अटकेतील आरोपी आणि विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यामुळे याची गंभीर दखल घेत बोर्डाने वरील भूमिका स्पष्ट केली असून ही सर्व कारवाई परीक्षेनंतरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबद्दल बोलताना मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले की, पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाही. या अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार असून सर्व परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ही कारवाई जाहीर करू. परीक्षा प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌾अधिकार्‍यांचा ‘वरदहस्त’...*

*_वसतिगृहातून अनुदान ‘फस्त’!_*

By pudhari |

इस्लामपूर : सुनील माने  

इस्लामपुरातील वसतिगृहातून दिल्या जाणार्‍या सोयी-सुविधा पहाता काही वसतिगृहातून कमी-अधिक प्रमाणात सावळा गोंधळ सुरू आहे. समाजकल्याणच्या ‘वरदहस्ताने’ वसतिगृहातील अनुदान ‘फस्त’ करण्याचा उद्योग बिनदिक्कतपणे सुरू असून कारवाईच्या नावाने ‘शिमगा’ असल्याने वसतिगृह चालकांचे  फावले आहे. याबाबत शासनाचा सामाजिक न्याय विभाग व जिल्हा परिषदेकडील समाजकल्याण विभागाने  तपासणी मोहीम आखून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, काही वर्षापूर्वी एका आश्रमशाळेतील मुलीचे विनयभंग प्रकरण आणि दत्त टेकडी परिसरात असणार्‍या वसतिगृहातील मुला-मुलींकडून पाय चेपून घेण्याचे प्रकार घडले होते. याप्रकरणी समाजकल्याण विभागाने कोणती कारवाई केली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

इस्लामपुरात बहे रोडवरील शासकीय मुलांचे वसतिगृह, महादेवनगरातील शासकीय मुलींचे वसतिगृह, कापूसखेड नाक्यावरील सद्गुरू आश्रमशाळेचे वसतिगृह, दत्त टेकडीवरील मूकबधिर व मतिमंद मुला-मुलींचे वसतिगृह, जावडेकर शाळेजवळील

भारतमाता वसतिगृह अशी एकूण समाजकल्याणच्यावतीने चालवली जाणारी पाच वसतिगृहे आहेत. मारहाणीचा धक्कादायक प्रकार...

शासकीय वसतिगृहात नववीतील विद्यार्थी संदीप कुशाबा मरगाळे याने मांजराने उष्टा केलेला नाष्टा न खाता फेकून दिल्याने अधीक्षकांनी विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असताना येथील भारतमाता विद्यार्थी वसतिगृहातही विद्यार्थ्यांना संतुलित आहार व मांसाहारी फिस्टच दिली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार गटविकास अधिकारी राहुल गावडे यांच्या तपासणीत आढळून आला आहे.  सदर वसतिगृहात दिल्या जाणार्‍या सोयी-सुविधातही प्रचंड तफावत असल्याचा अहवाल  गावडे यांनी जिल्हा परिषदेकडे पाठवूनदेखील जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने  विद्यार्थी मात्र  ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करीत आहेत.

वसतिगृहात दिल्या जाणार्‍या सोयी-सुविधा पहाता, मागासवर्गीय व भटक्या, विमुक्त जाती-जमातीतील तसेच अपंग विद्यार्थ्यांच्या सेवेच्या गोंडस नावाखाली विद्यार्थ्यांच्या ‘छळछावण्याच’ उभारल्या आहेत की काय? असा प्रश्‍न  केला जातो आहे.  त्यामुळे  सामाजिक संघटनांनी केवळ शासकीय वसतिगृहे अजेंड्यावर न ठेवता लाखो रुपयांचे अनुदान लाटणार्‍या आणि संस्थांच्यावतीने व्यवस्थापन होत असलेल्या वसतिगृहातील गैरप्रकारांनाही आळा घालून विद्यार्थी भयमुक्त होण्यासाठी अंकुश ठेवणे आवश्यक असल्याचे मत  जाणकार व्यक्त करीत आहेत.

सांगली जिल्ह्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून सचिन कवले  काम पाहत आहेत. कवले यांनी जिल्हा परिषदेत असताना वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडे कधीही पाहिले नाही. वसतिगृहाविषयी येणार्‍या तक्रारींविषयी चौकशीच न करण्याची त्यांची  खासियत आहे. सामाजिक न्याय विभागाकडील शासकीय वसतिगृहातील प्रशासकीय व्यवस्थापनाकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्यानेच हे सारे गंभीर प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. पत्रकार परिषदेत सचिन कवले यांना पत्रकारांनी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा किती अनुदान मिळते, शहरातील शासकीय वसतिगृहांच्या इमारतींचे उद्घाटन कधी झाले, या साध्या प्रश्‍नांची त्यांना उत्तरे देता आली नाहीत.  

*बोगस विद्यार्थी नोंद...*

गटविकास अधिकारी राहुल गावडे यांच्या सखोल तपासणीत भारतमाता विद्यार्थी वसतिगृहात हजेरी पटावर एकूण 104 विद्यार्थी दाखवले असून प्रत्यक्ष तपासणीत मात्र 52 विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळले असून अनुपस्थित विद्यार्थ्यांचे रजेचे अर्जही दिसून आले नाहीत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📃शिक्षकांना मिळणार पीएफ स्लिप*

First Published :14-March-2017

मुंबई : मुंबईतील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील सन २०१५-१६ व त्याआधीच्या वर्षांतील भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) स्लिप शिक्षकांना देण्यासाठी शिक्षणनिरीक्षक कार्यालयाने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिराचा फायदा मुंबईतील ७६ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनाही पीएफ स्लिप मिळावी,यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने विभागाकडे पाठपुरावा केला होता.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, शिक्षण निरीक्षक कार्यालयासोबत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक परिषदेने ६ मार्च रोजीसहविचार सभा आयोजित केली होती. त्या सभेत शिक्षकांच्या पीएफ स्लिप मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला होता. अनेक शाळांमधील शिक्षकांना पीएफ स्लिप मिळतनसल्याच्या तक्रारी विविध शाळांमधील शिक्षकांनी परिषदेकडे केल्या होत्या. सहविचार सभेत त्यावर चर्चा झाल्यानंतर शिक्षक परिषदेने वेतन व भविष्य निर्वाह निधी विभागाकडे पाठपुरावा करून शिबिरा घेण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने ९ ते २९ मार्चपर्यंत चेंबूर येथील शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिबिराचे आयोजन केले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃