twitter
rss

नवीन विद्यापीठ कायदा लागू
First Published :02-March-2017
मुंबई : राज्यात नवीन विद्यापीठ कायदा १ मार्चपासून लागू झाला आहे. संशोधन मंडळ, नवउपक्रम, नवसंशोधन मंडळ, सल्लागार परिषद यांमधील उद्योग व संशोधन जगतातील तज्ज्ञांच्या सहभागाने विद्यापीठ शिक्षण अद्ययावत होईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.विद्यार्थी स्पर्धात्मक युगात अधिक सक्षम बनेल. या कायद्यामुळे शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीत होणार असून विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेमध्येही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.कायद्यासंदर्भातील माहितीसाठी राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरू, कुलसचिव व शिक्षण तज्ज्ञांचीमुंबई येथे ३ मार्चला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापीठ प्रशासनात अनेक बदल होणार आहेत. व्यवस्थापन मंडळातील नवीन सदस्यांची निवड विद्यापीठाला ३१ आॅगस्टपर्यंत करावी लागणार आहे. तसेच व्यवस्थापन मंडळात विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून, विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनापासूनच भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेशी जोडले जावेत यासाठी १९९४ पासून रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका आता या कायद्यामुळे होणार आहेत.
   नवीन विद्यापीठ कायद्यात अनेक बदल करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना ‘चॉईस बेस’ शिक्षण घेता येणार आहे. महाविद्यालयीन निवडणुकांमुळे त्यांना भारतीय लोकशाही निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेता येणार आहे. शैक्षणिक दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा आहे.
- प्रा. पी. पी. पाटील, कुलगुरु,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ.

गुरुवर्य न्यूज
 शाळासिद्धी मानांकनाकडे निम्म्या शाळांनी फिरवली पाठ*
By pudhari | Publish Date: Mar 2 2017
पुणे : प्रतिनिधी
राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळांना शाळासिद्धी मानांकनासाठी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, नोंदणीसाठी अंतिम तारीख28 फेब्रुवारी ठेवण्यात आली होती. परंतु, या निर्धारित वेळेत राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 1 लाख 9 हजार 347 शाळांपैकी केवळ 50 हजार 776 शाळांनीच आत्तापर्यंत नोंदणी पूर्ण केली असून, निम्म्यापेक्षा जास्त शाळांनी मानांकन नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या शाळा नोंदणी कधी करणार व नोंदणी न झाल्यास यांच्यावर काय कारवाई होणार, असा सवाल विचारला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून जि.प. शाळांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल, ज्ञानरचनावाद, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नवोपक्रम, प्रशिक्षण, प्रदर्शन, सादरीकरण, नावीन्यपूर्ण उपक्रम, अध्ययन, अध्यापन, कृतिशील अध्ययन पद्धती यांसह विविध माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. परंतु, जि.प. शाळांबरोबर इतरही शाळांच्या गुणवत्तेत भर पडावी, यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न शाळासिद्धी उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यातून अनेक शाळांचे वास्तव समोर येणार आहे. परंतु, हे वास्तव समोर येऊ नये म्हणूनच की, काय राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शाळांनी या नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
शाळासिद्धी उपक्रमासंदर्भात काम करणार्‍या अधिकार्‍यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळा या 100 टक्के शाळासिद्धी मानांकनासाठी नोंदणी करतील, असे छातीठोकपणे सांगितले होते. परंतु, या अधिकार्‍यांच्या सूचनेला देखील या शाळांनी हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळासिद्धीच्या संकेतस्थळावरूनच मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरमध्ये 5 हजार 351 पैकी 2 हजार 673, अकोलामध्ये 1 हजार 831 पैकी 993, अमरावतीमध्ये 2 हजार 882 पैकी 1 हजार 771, औरंगाबादमध्ये 4 हजार 174 पैकी 1 हजार 61, भंडारामध्ये  1 हजार 334 पैकी 735, बीडमध्ये 3 हजार 711 पैकी 2 हजार 140, बुलढाणामध्ये 2 हजार 450 पैकी 2 हजार 43, चंद्रपूरमध्ये 2 हजार 542 पैकी 1 हजार 367, धुळ्यामध्ये 1 हजार 998 पैकी 1 हजार 186, गडचिरोलीमध्ये 2 हजार 92 पैकी केवळ 19, गोंदियामध्ये  1 हजार 703 पैकी 194, हिंगोलीमध्ये 1 हजार 299 पैकी 519, जळगावमध्ये 3 हजार 344 पैकी 2 हजार 536, जालनामध्ये 2 हजार 367 पैकी 1 हजार 818, कोल्हापूरमध्ये 3 हजार 692 पैकी 1 हजार 604, लातूरमध्ये 2 हजार 665 पैकी 968, मुंबई (उपनगर) मध्ये  2 हजार 519 पैकी 677, मुंबई-2 मध्ये 1 हजार 695 पैकी 381, नागपूरमध्ये 4 हजार 84 पैकी 1 हजार 758, नांदेडमध्ये 3 हजार 738 पैकी 1 हजार 760, नंदूरबारमध्ये 2 हजार 47 पैकी 1 हजार 207, नाशिकमध्ये 5 हजार 599 पैकी 3 हजार 76, उस्मानाबादमध्ये 1 हजार 852 पैकी 544, पालघरमध्ये 3 हजार 264 पैकी 1 हजार 403, परभणीमध्ये 2 हजार 97 पैकी 1 हजार 857, पुण्यामध्ये 7 हजार 249 पैकी 3 हजार 675, रायगडमध्ये 3 हजार 862 पैकी 446, रत्नागिरीमध्ये 3 हजार 352 पैकी 1 हजार 556, सांगलीमध्ये 3 हजार 9 पैकी 1 हजार 710, सातारामध्ये 3 हजार 877 पैकी 2 हजार 562, सिंधुदुर्गमध्ये 1 हजार 777 पैकी 267, सोलापूरमध्ये 4 हजार 842 पैकी 1 हजार 597, ठाणेमध्ये 4 हजार 806 पैकी 2 हजार 742, वर्धामध्ये 1 हजार 518 पैकी 655, वाशिममध्ये 1 हजार 361 पैकी 653, तर यवतमाळमध्ये 3 हजार 364 पैकी 982 शाळांनीच आत्तापर्यंत नोंदणी पूर्ण केली आहे. त्यामुळे उर्वरित शाळांची नोंदणी कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. यासंदर्भात शाळासिद्धी उपक्रमात काम करणार्‍या विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील साधारण 18 ते 20 हजार शाळा या सध्या काही ठराविक गोष्टींची पूर्तता करणे बाकी असल्यामुळे नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये अडकल्या आहेत. मात्र, उर्वरित सर्व शाळांकडून येत्या 15 मार्चपर्यंत कसल्याही परिस्थितीत नोंदणी पूर्ण करून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर व तालुका स्तरावर झोनल ऑफिसरची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत सर्व शाळांची नोंदणी पूर्ण होणार का, याकडे अधिकार्‍यांबरोबरच नोंदणी झालेल्या शाळांचे लक्ष लागले आहे.
गुरुवर्य न्यूज
पुणे जि.प.उपक्रम*
*अंगणवाडी विद्यार्थी थेट पहिलीच्या वर्गात*
By pudhari | Publish Date: Mar 2 2017
पुणे : प्रतिनिधी
अंगणवाडीतील मुलांना आता थेट पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. खासगी शाळांची वाढती संख्या आणि पालकांचा खाजगी शाळेकडे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी वाढता कल लक्षात घेऊन, जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या 3 हजार 700 इतकी आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता विकास वाढीसाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात. परंतु, तरीही जिल्हा परिषद शाळांमध्ये पालक विद्याथ्यार्र्ंना प्रवेश देण्यासाठी अनुकूल नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे खासगी शाळांची वाढत चाललेली संख्या हेच आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा म्हणून खासगी शाळांकडून पालकांचे लांगुलचालन करण्यात येते. या शाळांचे वाढते आव्हान लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा म्हणून आता नावीण्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक शाळा एकत्र येऊन सर्वेक्षण करणार आहेत. तसेच कोणता विद्यार्थी कोणत्या शाळेत गेला, याची नोंदही ठेवण्यात येणार आहे.
सर्वेक्षणातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या शाळेत कसा दाखल करता येईल, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच दाखल झालेला विद्यार्थी आपल्या शाळेत कसा टिकेल, याकडेही सातत्याने लक्ष देण्यात येणार आहे.
खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा दर्जा टिकविण्यासाठी विशेष उपाययोजना आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच खाजगी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची जाहिरात स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे. तसेच, आपल्या शाळेतून शिकलेले माजी विद्यार्थ्यांचे सध्याचे सामाजिक स्टेटस जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, जेणेकरून प्राथमिक शाळेबद्दल पालकांच्या मनामध्ये आश्‍वासकता निर्माण व्हावी, याकडे लक्ष देण्यात येणार आहे.
गुरुवर्य न्यूज
शिक्षकांचा बहिष्कार कायम*
By pudhari
मुंबई : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल 5 जून पूर्वी जाहीर करणे बंधणकारक असल्याने मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रश्‍न शासन दरबारी टाकला मात्र मंगळवारी शिक्षणमंत्र्यांनी केवळ आश्‍वासन देवून गेल्यावर्षी प्रमाणेच बोळवण केल्याने शिक्षकांनी असहकार आंदोलन कायम ठेवले आहे. त्यामुळे बारावीचा यंदा निकाल लकटण्याची चिन्हे आहेत.
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी यंदाही बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार घातला आहे. गेल्यावर्षी पेपर तपासणारच नाही अशी भूमिका घेतल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण मागण्या मान्य करण्याबाबत आश्‍वासन देवून वर्ष उलटले तरी मागण्या मान्य न झाल्याने पून्हा यंदाही या परीक्षेवर बहिष्कार आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे.  याप्रकरणी मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांच्यासमवेत बैठक झाली. मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचे लेखी आश्‍वासन न दिल्याने परीक्षेवर सुरू असलेले अहसहकार आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले. सरकार आमच्या मागण्याबाबत सकारात्मक आहेत. मात्र जोपर्यंत लेखी आश्‍वासन देत नाही. तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात 60 हजार तर मुंबईत 4 हजार 500 शिक्षक पेपर तपासतात. एका परीक्षकाकडे 200 ते 300 उत्तर पत्रिका तपासण्यासाठी तर मॉडरेटर्सकडे एक ते दोन हजार उत्तरपत्रिका नियमनासाठी येतात त्यामुळे दररोज एक अशा संथ गतीने पेपर तपासले तर याचा निकालावर फटका बसण्याची शक्यता आहे.
गुरुवर्य न्यूज
‘नीट’साठी विद्यार्थ्यांच्या तुलनेत परीक्षा केंद्रे कमी*
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
देशभरातील मेडिकल कॉलेजांच्या प्रवेशासाठी येत्या ७ मे रोजी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा मुंबईत गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी यंदा राज्यभरातून एकूण २ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात फक्त सहाच परीक्षा केंद्रे मंजूर करण्यात आल्याने या परीक्षेचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
देशभरातील मेडिकल कॉलेजांतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर ही सहाच परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. ७ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही परीक्षा होणार असून परीक्षा केंद्र गाठताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी मुंबई किंवा ठाणे गाठावे लागणार आहे.
संख्या वाढविण्याचे आश्वासन
विद्यार्थ्यांचा होणारा गोंधळ थांबविण्यासाठी याप्रश्नी सोमवारी ‘अभाविप’च्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रे वाढविण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले.
गुरुवर्य न्यूज