twitter
rss

🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

🌞वार - मंगळवार

🌄 दिनांक - 21/03/2017

*🌳जागतिक वनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌳*

🎯 *आजच्या शैक्षणिक बातम्या* 🎯

-----------------------------------------------
_*साभार -Online पुढारी,लोकसत्ता,लोकमत,म.टा.,सकाळ .*_

-----------------------------------------------

_*संकलन - गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

-----------------------------------------------
'

दररोज नियमित शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..

🌳शिक्षक बदल्यांचा प्रश्‍न निकालात काढणार*
*- महादेव जानकर*

By pudhari | Publish Date: Mar 20 2017

बांबवडे : वार्ताहर

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या गैरसोईच्या बदल्याबाबतचा निर्णय अधिवेशन संपण्यापूर्वी निकालात काढू, असे आश्‍वासन राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिले.

राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय महामंडळ दौंड (जि. पुणे) येथे आयोजित मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अ‍ॅड. राहुल  कुल होते.

ते म्हणाले, राज्यातील शिक्षकांच्या महत्वपूर्ण बदली संदर्भातील विषय हा अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांना सोबत घेऊन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून निश्‍चितपणे सोडविण्यास भाग पाडू तसेच यापुढे आमचे सरकार असेपर्यंत शिक्षकांना मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही. तसेच यापुढे पोलिसांच्या बरोबरीने शिक्षकांना राज्यशासन घरे देण्याचा महत्वपूर्ण विचार करीत आहे. एम.एस.सी.आय.टी च्या संदर्भातील विषय शालेय शिक्षणमंत्र्याशी चर्चा करून सोडवू. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भविष्यात सरकार सकारात्मक अभ्यास करून पावले उचलेल.

यावेळी दौंडचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल म्हणाले, शिक्षकांचे प्रश्‍न सहकार्याने पुढे सोडविले जातील. सध्या इंग्रजी माध्यमातून मुलांचा ओढा मराठी माध्यमाकडे वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

याप्रसंगी शिक्षकसंघाचे राज्यनेते संभाजीराव थोरात म्हणाले, आतापर्यंत शिक्षकांचे सर्व प्रश्‍न संघाच्या व्यासपीठावर सुटले आहेत. तीन लाख शिक्षकांची एकजुटीची एवढी मोठी संघटना महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाही. शिक्षक आनंददायी असेल तर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया यशस्वी होऊ शकते. त्यासाठी शासनाने जाचक बदलीसारखे निर्णय त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा राज्यभर मोर्चे व आंदोलन केले जाईल. याची दखल त्वरित शासनाने घ्यावी.

राज्य अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे म्हणाले, नगरपालिकांतील शिक्षकांचे पगार वेळेत झाले पाहिजेत, जुनी पेन्शन योजना आंतर जिल्हाबाह्य बदली हे प्रश्‍न शासनाने सोडवावेत.

स्वागत, प्रास्ताविक सरचिटणीस आप्पासाहेब कुल यांनी केले. एन. वाय. पाटील यांनी आभार मानले. यावेळी राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.

या सभेस राज्य संघाचे उपाध्यक्ष हंबीरराव पवार, राज्यसंपर्क प्रमुख राजकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव, तानाजी खोत, आनंत सपकाळ, पाटील आदी उपस्थित होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌴इ.7वी व 9 वी चा अभ्यासक्रम बदलणार*

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातवी व नववीचा अभ्यासक्रम २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून बदलणार आहे. नवीन अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात असून, नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्याचे पुस्तके उपलब्ध होणार आहेत. घोकमपट्टी पद्धतीला दूर करत कृतीयुक्त, उपयोजनात्मक (अॅप्लिकेशन बेस) असा हा अभ्यासक्रम असणार आहे. ‘आयसीटी’विषयाचा अंतर्भाव यात दिसणार आहे.
सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून सातवी व नववीच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके बदलणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रमातील बदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बालभारतीने विविध विषय समित्यांची नेमणूक केली होती.

      दोन्ही वर्गांच्या सर्व विषयांच्या पुस्तकांची रुपरेषा तयार असून, या पुस्तकांच्या समीक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. अंतिम मंजुरीची प्रक्रियाही गतीने होत आहे. त्यामुळे येत्या जूनपासून विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके मिळणार आहे. पाठ्यपुस्तकात आमूलाग्र बदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, संपूर्ण अभ्यासक्रम हा कृतीयुक्त आणि उपाययोजनात्मक असणार आहे. त्यामध्ये एखाद्या विषयाची संकल्पना समजून सांगायची असेल, तर ती कृतीवर संकल्पना समजविण्यावर भर असेल. स्वतः कृतीतून विषयाचे ज्ञान हे त्याला आत्मसात करणे सोपे जाणार आहे.
विषयाचे संदर्भ कसे शोधायचे, त्यात तंत्रज्ञानाचा सहभाग याबाबतही माहिती दिलेली असेल. ‘शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र’ अंतर्गत ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीने शिक्षणाला नवी दिशा मिळाली. ज्ञानरचनावादात शैक्षणिक साहित्यावर भर देण्यात आला. त्यालाच अनुसरून अभ्यासक्रमात विविध गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे इयत्ता नववीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यभर मोठी आहे. त्याचा विचार करत, अभ्यासक्रमात काही नव्याने बदल केल्याचेही सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.

*‘आयसीटी’चा विषयातच समावेश*

माहिती तंत्रज्ञान (आयसीटी) विषय हा सध्या स्वतंत्र विषय आहे. नवीन अभ्यासक्रमामध्ये हा विषय नसणार आहे. या विषयाचा समावेश सर्व महत्वाच्या विषयांमध्ये केला जाईल, असे सुत्रांनी सांगितले. ज्यामध्ये इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर येथपासून ते विषयाशी संदर्भात इंटरनेटवरून संदर्भ कसे शोधायचे याबाबत माहिती असेल. ज्यामध्ये कार्टून, स्लोगनचाही समावेश असणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषय, संकल्पना सहज आणि सोप्या वाटतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अभ्यासक्रमातील बदल हे काळानुरूप व उपयुक्त आहेत. अभ्यासक्रम कृतीयुक्त असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजने अधिक सोपे होईल आणि त्यांना विषय शिकल्याचा आनंदही घेता येईल.

- गजानन सूर्यवंशी, सदस्य, विज्ञान अभ्यास समिती, बालभारती.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎄देशात २३ विद्यापीठे, २७९ संस्‍था बनावट*

By pudhari | Publish Date: Mar 20 2017

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था

देशामध्‍ये शिक्षण व्‍यवस्‍थेतील अनागोंदीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्‍य अधांतरी आहे. नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनेच (एआयसीटीई) ही माहिती दिली आहे. देशात २३ विद्यापीठे व २७९ संस्‍था बनावट आहेत, असे या संस्‍थांच्‍या वेबसाइटवर म्‍हटले आहे.

यूजीसी आणि एआयसीटीईने गेल्‍या महिन्‍यात आपल्‍या वेबसाइटवर बनावट विद्यापीठ व संस्‍थांची यादीच टाकली होती. तसेच याबाबत यंदाच्‍या प्रवेश प्रक्रियेबाबत चेतावणी दिली होती. यामध्‍ये फक्‍त दिल्‍लीमध्‍येच ६६ महाविद्यालये व ७ विद्यापीठे बनावट असल्‍याचे सांगितले होते.

तेलंगाना, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्‍ट्रात सर्वाधिक बनावट शिक्षण संस्‍था असल्‍याची माहिती दिली होती. या संस्‍था अभियांत्रिकी व इतर अभ्‍यासक्रमाचे शिक्षण देतात. मात्र, यांना कोणतीही अधिकृत स्‍वरुपाची मान्‍यता नाही. तसेच प्रमाणपत्र देण्‍याचा अधिकारही नाही. या संस्‍थानी दिलेले प्रमाणपत्रास केवळ कागदाच्‍या तुकड्याचीच किंमत आहे.

मनुष्‍यबळ विकास राज्‍यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी राज्‍यसभेत नुकतेच माहिती देताना सांगितले होते की, मंत्रालयाने राज्‍यांना बनावट विद्यापीठांचा शोध घेऊन त्‍यांच्‍या विरोधात कारवाई करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

या बनावट शिक्षण संस्‍थाच्‍या सुळसुळाटामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना अधिकृत व मान्‍यताप्राप्‍त संस्‍थांचीच निवड करावी. तसेच संपूर्ण चौकशी करूनच कोणत्‍याही शिक्षणासाठी प्रवेश घेण्‍याची आवश्‍यकता आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋राज्यात ७८ बोगस शिक्षण संस्था!*

First Published :21-March-2017

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली -

  विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांची मान्यता नसलेली राज्यांत २३ बोगस विद्यापीठे आहेत. त्यांना पदव्या देण्याचा अधिकार नाही, तसेच आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ची मान्यता नसलेल्या देशात ३४१ संस्था व महाविद्यालये आहेत, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ करीत बिनबोभाट त्यांनी आपला कारभार चालवला आहे. अशी विद्यापीठे व तंत्रशिक्षण संस्थांची त्वरित चौकशी करून त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवावी, अशा सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत, अशी माहिती मनुष्यबळ विकास राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी सोमवारी राज्यसभेत दिली.यूजीसीची मान्यता नसलेल्या २३ बोगस विद्यापीठांपैकी ७ बोगस विद्यापीठे दिल्लीत आहेत, तर महाराष्ट्रात नागपूर येथे राजा अरेबिक विद्यापीठालाही मान्यता नाही. याशिवाय ३४१ संस्था व महाविद्यालयांना एआयसीटीईची मान्यता नाही. यापैकी दिल्लीत ६६ तर मुंबईआणि महाराष्ट्रात मिळून ७७ संस्था आहेत. महाराष्ट्रातल्या बोगस संस्थांमध्ये मुंबईत ४१, नवी मुंबईत ११, ठाण्यात ११, कल्याणला २ असून, पुण्यात ७, नाशिक जिल्ह्यात ३, कोल्हापूर, अहमदनगर व औरगाबाद येथे प्रत्येकी १ अशी त्यांची विभागणी आहे. यूजीसी व एआयसीटीईच्या वेबसाइट्सवर या बोगस विद्यापीठे व मान्यता नसलेल्या विद्यापीठे, तंत्रशिक्षण संस्था व महाविद्यालयांची संपूर्ण यादी आली आहे.पुढील महिन्यात महाविद्यालये व विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपण प्रवेश घेत असलेले विद्यापीठ, संस्था अथवा महाविद्यालयास यूजीसी अथवा एआयसीटीईची मान्यता आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे, असे सांगून महेंद्रनाथ पांडे म्हणाले की, दिल्लीखेरीज, मुंबई, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, प.बंगाल या ठिकाणी बोगस विद्यापीठे वबोगस तंत्रशिक्षण संस्थाचा सुळसुळाट झाला आहे.

*पदव्या म्हणजे रद्दीच*

     या शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अथवा प्रमाणपत्रांची किंमत रद्दी कागदापेक्षा अधिक नाही.या सर्व बाबींची माहिती यूजीसी व एआयसीटीईने आपल्या वेबसाइटवर दिली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सावध राहावे, असेही मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎄कोल्हापूर माध्य. शिक्षणाधिकार्‍यांवर होणार्‍या कारवाईकडे लक्ष*

By pudhari | Publish Date: Mar 21 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यावरील कारवाईची केवळ औपचारिकता उरली आहे. चौकशी समितीकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर आलेला अहवाल जिल्हा परिषद सीईओ व शिक्षण उपसंचालक या दोघांनीही शिक्षण आयुक्‍तांकडे सादर केला आहे. आता शिक्षण आयुक्‍त कोणती कारवाई करतात, याचीच प्रतीक्षा जिल्हा परिषदेला लागून राहिली आहे.

शिक्षणाधिकार्‍यांविरोधात आलेल्या लेखी तक्रारी आणि दैनंदिन कामकाजाची तपासणी करून प्रथमदर्शनी त्यांना दोषी ठरवून, पुढील निर्णयासाठी शिक्षण आयुक्‍तांकडे फाईल पाठवण्यात आली आहे. या अहवालानुसार शिक्षणाधिकार्‍यांच्या कामात शिस्तभंग कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी अथवा सेवेतून निलंबित की, बदली करावी यासंदर्भात शिक्षण आयुक्‍तांकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. शिक्षण आयुक्‍तांना फाईल मिळाल्यावर दहा दिवसांत ही कारवाई करावी, असे कायद्याने अपेक्षित आहे. शिक्षणाधिकारी हे पद वरिष्ठ वर्गात मोडत असल्याने त्यांच्यावर कारवाईचे अधिकारही शिक्षण आयुक्‍त व त्यांच्या शिफारशीनंतर राज्य सरकारलाच असतात. यावर्षीपासून मात्र शिक्षण सचिवांनी कारवाईचे अधिकार जरी जि.प. सीईओ आणि मनपा आयुक्‍तांना दिले असले, तरी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांवरील कारवाई अधिकार मात्र शिक्षण आयुक्‍तांच्याच हातात आहेत.

जिल्हा परिषदेच्या सीईओंनी पाठवलेल्या फाईलनुसार शिक्षण आयुक्‍तांनी दोन सदस्यीय समितीकडून याप्रकरणी शिक्षणाधिकार्‍यांची फेरचौकशी केली. जिल्हा परिषद व शिक्षण उपसंचालक या दोन्ही कार्यालयांत सर्व कागदपत्रे तपासून, भेटीगाठी घेऊन अहवाल तयार केला आहे. हा अहवाल शिक्षण आयुक्‍तांकडे सादर केला गेला आहे. आता या अहवालानुसार बदली की बडतर्फी, याचा निर्णय होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌱प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी 'फेस रीडिंग'*

First Published :21-March-2017

मुंबई : राज्यभरात बारावीच्या परीक्षेत चार पेपर फुटल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पेपरफुटी प्रकरणाने बोर्डाची डोकेदुखी वाढली, याची पुनरावृत्ती विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होऊ नये म्हणून प्रश्नपत्रिकांची सुरक्षा वाढवण्यात आली. परीक्षा केंद्रात आॅनलाइनद्वारे प्रश्नपत्रिका पाठवूनही पेपरफुटी होण्याचा धोका असल्यामुळे प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी ‘फेस रीडिंग’ सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्याचबरोबरीने रेकॉर्डिंगआणि वॉटर मार्किंग सिस्टिमही तयार आहे.व्हॉट्सअॅपचा वापर वाढल्यापासून परीक्षा काळात प्रश्नपत्रिकेची सुरक्षा हा यंत्रणेसाठी डोकेदुखीचाविषय ठरतो. परीक्षेच्या काळात प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी विद्यापीठाने आॅनलाइन प्रश्नपत्रिका पाठवण्यास सुरुवात केली. तरीही यात काही त्रुटी राहिल्याने पेपरफुटीचे सत्र सुरू आहे. या वेळी हे टाळण्यासाठी फेस रीडिंग सिस्टिम सुरू केली आहे. प्रत्येक महाविद्यालयातील चार व्यक्तींचे फेस रीडिंग घेतले आहे. या चार जणांनाच आॅनलाइन आलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येणार आहे. विद्यापीठाच्या सिस्टिममधीलफोटोशी चेहरा जुळला तरच पुढील प्रक्रिया सुरूहोईल.फेस रीडिंग झाल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाइलवर एक लॉग इन आयडीचा मेसेज येईल. हा आयडी टाकल्यानंतरच प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. प्रश्नपत्रिका डाऊनलोड झाल्यानंतर त्याच खोलीत प्रिंटरवर प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट काढल्या जाणारआहेत. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचे वाटप थेट वर्गात होेईल. यामुळे प्रश्नपत्रिकावाटपातील व्यक्तींचा समावेश कमी होणार आहे. या सर्व प्रक्रियेचा लाइव्ह व्हिडीओ काढला जाणार असून, तो थेट परीक्षा केंद्रातीलकंट्रोल रूममध्ये प्रसारित होणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌿 *अकरावी ऑनलाइन मेपासून?*

Maharashtra Times | Updated Mar 21, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी यंदा शालेय शिक्षण विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून या प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेच्या बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठवडाभरात ही संपूर्ण प्रक्रिया निश्चित केली जाणार असून मेच्या दुसऱ्या आठवड्यात ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा शिक्षण उपसंचालक विभागाचा मानस आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींविरोधात पुण्यातील पालक काही दिवसांपूर्वी न्यायालयात गेले होते. त्यानुसार गेल्यावर्षी या प्रवेश प्रक्रियेत अनेक बदल केल्यानंतर यंदाही या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्याची सूचना न्यायालयाने केली होती. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अनेक मोठे बदल करण्यात येणार असून ही प्रवेश प्रक्रिया निश्चित करण्यासाठी शिक्षण उपसंचालक विभागाने काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, यंदा या प्रवेशासाठी नवी वेबसाइट तयार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर गेल्यावर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया उश‌रिाने सुरू झाल्याने आणि त्यानंतर ती लांबलचक सुरू राहिल्याने त्याचा फटका संपूर्ण प्रवेश प्रक्रियेला बसला होता. त्यामुळे यंदा हा फटका बसू नये म्हणून लवकरात लवकर ही या प्रवेशाची वेबसाइट सुरू केली जाणार आहे.

याबद्दल शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाने यंदा ७ जानेवारी रोजी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सरकार निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार नवे बदल केले जाणार आहेत. सध्या त्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण केले जाणार आहे. यंदाच्या या प्रवेशासाठीच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी टेंडर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

*असे आहेत बदल*

> विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना (पहिल्या फेरीमध्ये) संबंधित पालिका क्षेत्रातील कोणतेही किमान एक व जास्तीत जास्त दहा कॉलेजांचे पसंतीक्रम भरावे लागणार आहेत.

> दुसऱ्या फेरीपासून पसंतीक्रम बदलताना ते कितीही देता येतील.

> एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे फक्त एकाच शाखेची मागणी करता येईल.

> अर्जातील भाग दोनमधील शाखा बदलून कॉलेज पसंतीक्रम बदलण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
> पहिल्या फेरीनंतर विद्यार्थ्यास त्या त्या फेरीसाठी उपलब्ध जागांनुसार पसंतीक्रम बदलता येईल.

> पसंतीक्रम न बदलल्यास आधीच्या फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील.

> व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेशही ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत.

> नियमित प्रवेश फेरीपूर्वी कोट्यातील प्रवेशासाठी शून्य फेरीचे आयोजन केले जाईल. त्यासोबत व्यावसायिक व द्विलक्षी अभ्यासक्रमासाठीच्या आरक्षित जागा भरण्यात येतील.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃