twitter
rss

📋12वी परीक्षा पेपरफुटी*

*♻व्हॉट्सअॅपची डोकेदुखी*

*शिक्षणमंत्र्यांकडून दखल*

*बोर्डाकडून पेपरफुटीचा तपास सायबर सेलकडे*

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

परीक्षा सुरू होण्याआधीच बारावीचा मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर उपलब्ध झाल्याने गुरुवारी एकच हाहा:कार उडाला. बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणाचा छडा कसा लावयचा असा प्रश्न बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सतावत आहे. सलग तीन वर्षे घडलेल्या अशा घटनांमुळे 'व्हॉट्सअॅप' हे बोर्डासाठी डोकेदुखी ठरत आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे राज्यभरात घेण्यात येत असलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान गुरुवारी व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर आढळून आल्याने खळबळ उडाली. पेपर सुरू होण्याअगोदर म्हणजे १०.४६ मिनिटांनी हा पेपर व्हॉट्सअॅप ग्रुपवर आढळून आला. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर पेपर वाचण्यासाठी देण्यात येतो. त्या दरम्यानच हा फोटो काढून तो व्हॉट्सअॅपवर पोस्ट झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी बेलापूर येथील सायबर सेलकडे गुरुवारी तक्रार केल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दतात्रय जगताप यांनी दिली. फेरपरीक्षा होणार नसल्याचे यावेळी बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.
दुसरीकडे परीक्षेच्यावेळी मोबाइलचा वाढता वापर होत असल्याच्या तक्रारींमुळे बोर्डाची चिंता वाढली आहे. व्हॉट्सअॅपला आळा कसा घालावा, यासाठी बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठकांचे फार्स सुरू झाले आहेत. मुख्य म्हणजे, व्हॉट्सअॅपवर पोस्ट झालेल्या पेपरच्या तपासासाठी बोर्डाकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने बोर्डाचा कस लागणार आहे.

*सहज उपलब्ध*

बारावी बोर्डाचा मराठी पेपर ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आढळून आला आहे तो विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध होत असल्याची माहिती बारावीच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहेत. या व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक विद्यार्थ्यांच्या अनेक ग्रुपच्या माध्यमातून येत असल्याची माहितीही समोर आली आहे.
हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी सायबल सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान १० मिनिटे अगोदर पेपर वाचण्यासाठी देण्यात येतो. या पद्धतीचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याने ती प्रथा बंद करू नये, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सायबर सेलच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘मटा’ला सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

♻12 वी चा पेपर व्हॉटस अॅपवर*

By pudhari

मुंबई  : प्रतिनिधी

राज्य शिक्षण मंडळाचा मराठीचा पेपर व्हॉट्स अ‍ॅपवर आढळून आल्याने बोर्डाच्या अधिकार्‍यांची धावपळ उडाली आहे. सकाळी 10.46 वाजता हा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर मिळाला होता. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे पेपर वाचण्यासाठी देण्यात येतो. त्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे कळते. मुंबईतून हा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर आल्याचे बोलले जात असून राज्य शिक्षण मंडळ याबाबत अधिक तपास करीत आहेत. गेल्यावर्षी देखील बुक किपींगचा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर आढळून आला होता. तशाचप्रकारे हा मराठीचा पेपर आढळून आला असून कोचिंग क्लासचा यात हात असल्याचे बोलले जात आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परीक्षा राज्यभरात सुरू आहे. दरम्यान, आजच्या तिसर्‍या दिवशी मराठीचा पेपर होता. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येते. त्यानुसार आजही दहा मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात आली होती. त्याच वेळेत कोणी तरी या प्रश्‍नपत्रिकेचा फोटो काढून व्हॉटस अ‍ॅपवर टाकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आहे. 10.46 वाजता हा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर आढळून आला. हा पेपर  बारावीच विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर आढळून आला.

हा पेपर व्हॉटस् अ‍ॅपवर आढळून आल्याची तक्रार दुपारीच बोर्डाच्या अधिकार्‍यांना मिळाल्याची माहिती हाती आली असून हा पेपर नेमका कुठून समोर आला आहे, याचा शोध घेणे राज्य मंडळाकडून सुरु असून सायबर क्राईम कडे तक्रार करण्यात आली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌿मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रमबदल वादात*

*बुक्टोने दर्शविला विरोध;*

*राज्यपालांसह कुलगुरूंना दिले निवेदन*

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई विद्यापीठांतर्गत शिकविले जाणारे अभ्यासक्रम एकाच वेळी बदलण्याचा कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतलेला निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कुलगुरूंच्या या निर्णयाला विद्यापीठ प्राध्यापकांच्या ‘बुक्टो’ या संघटनेने विरोध दर्शविला असून याविरोधात संघटनेने राज्यपालांकडे दाद मागितली आहे. कुलगुरूंनी विशेषाधिकार वापरून घेतलेला हा निर्णय मुळात कायद्यानुसार नसल्याचा आरोप यावेळी बुक्टो संघटनेतर्फे करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून एकाचवेळी अनेक अभ्यासक्रमात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घेतला. एकाचवेळी इतक्या अभ्यासक्रमांत बदल करणारे हे पहिले विद्यापीठ ठरले होते. यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सुचविलेल्या बदलांना त्या त्या प्राधिकरणाची मंजुरी घेऊन हे बदल करण्यात आले होते. आता मात्र या बदलांविरोधात बुक्टो संघटना मैदानात उतरली असून कोणताही धोरणात्मक निर्णय न घेण्याची राज्य सरकारची सूचना असताना हा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न बुक्टोतर्फे करण्यात आला आहे. विद्यापीठ कायदा १९९४च्या कलम १४ (७) चा चुकीचा वापर करण्यात आला आहे. मुळात हा अधिकार आणीबाणीच्या काळात वापरायचा असून सध्या कोणत्याही प्रकारची आणीबाणीची परिस्थिती नसताना कुलगुरूंनी हा अधिकार का वापरला, असा हल्लाबोलही चढविण्यात आला आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांत अभ्यासक्रम कसा काय बदलू शकतो, याबाबतही आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
कुलगुरूंनी केलेला हा अभ्यासक्रमबदल विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून योग्य नसून याचा फटका कॉलेजे आणि विद्यापीठांना बसत असल्याची खंत बुक्टोने
राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम बदलाचा हा निर्णय मागे घेण्याची मागणी त्यांनी केली असून याबाबत राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी बुक्टो संघटनेने दिलेल्या निवेदनात केल्याची माहिती संघटनेच्या सरचिटणीस मधू परांजपे यांनी दिली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃