🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* -3⃣5⃣4⃣
*आईचा मृतदेह घरात, तरीही मुलीने दिली दहावीची परीक्षा ;*
*वाचा पुनमच्या जिद्दीची कहाणी*
उस्मानाबाद- आईचा अचानक मृत्यू झालेला असतानाही उस्मानाबाद येथील एसआरटी कॉलनीत राहणाऱ्या मुलीने धाडस करून दहावीची परीक्षा दिली. पेपर संपल्यावर तिच्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घरात कोणाचा तरी मृत्यू झालेला असताना कोणतेही काम करण्याची कल्पनाच करवत नाही. परीक्षेला जाणे तर दूरचीच गोष्ट आहे. त्यात जन्मदात्या आईचा मृत्यू म्हणजे आभाळ फाटल्यासारखीच परिस्थिती असते. तरीही एसआरटी काॅलनीत राहणाऱ्या पूनम सुनील कांबळे हिने दहावीच परीक्षा दिली. तिची आई रमाबाई कांबळे (४५) यांचा मृत्यू अचानक रविवारी (दि. २६) रात्री आठ वाजेच्या सुमारास झाला. यामुळे घरात दुखा:चा डोंगर कोसळला. पूनमसह तिच्या दोन भाऊ एक बहिणीने आक्रोश सुरू केला. प्रत्यक्ष जन्मदात्रीच्या मृत्युमुळे कोणालाच दुख: सहन होत नव्हते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. २७) दहावीचा संगणक शिक्षणाचा पेपर होता. पूनमने हा पेपर दिला नसता तर तिचे शैक्षणिक नुकसान झाले असते. नगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक असलेले पूनमचे वडील सुनील कांबळे अन्य कुटुंबीयांनी पूनमला पेपरसाठी जाण्यास प्रवृत्त केले. मनावर दगड ठेवून सर्व दुख: गिळून तिने शरद पवार हायस्कूलच्या केंद्रात परीक्षा दिली. पेपर संपल्यावर आईच्या मृतदेहावर १.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. पूनमच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......
- http://guruvarykm.blogspot.in/
या आपल्या Blog ला भेट द्या.....