twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣4⃣3⃣

*सोलापूरच्या प्रयोगवीर शिक्षकाला कॅनडामध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’चे निमंत्रण*

*टोरोन्टो येथे आयोजित जागतिक परिषदेत रणजितसिंह डिसले* 🛩

प्रतिनिधी, सोलापूर

सोलापूरच्या एका जिल्हा परिषद शाळेतील प्रयोगवीर शिक्षकाच्या अफलातून प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेत त्यांना कॅनडात होणाऱ्या माहिती व तंत्रज्ञानविषयक जागतिक परिषदेसाठी सन्मानाने आमंत्रित केले आहे. रणजितसिंह डिसले असे या प्रयोगवीर शिक्षकाचे नाव असून त्यांनी तयार केलेल्या ‘क्यूआर कोडेट’ पाठय़पुस्तकाच्या उपक्रमाची जगातातील तीनशे अभिनव प्रकल्पांसाठी ‘मायक्रोसॉफ्ट’च्या वतीने निवड करण्यात आली आहे.
डिसले हे मूळचे बार्शीचे रहिवासी आहेत. येत्या २१ ते २३ मार्च या कालावधीत टोरोन्टो येथे आयोजित जागतिक परिषदेत डिसले यांच्याकडून क्यूआर कोडेट पाठय़पुस्तकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अलीकडे कोणते ना कोणते उपक्रम राबविले जात असून त्यांची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. यात रणजितसिंह डिसले यांच्या उल्लेखनीय उपक्रमाची दखल थेट मायक्रोसॉफ्ट्स कंपनीने घेतल्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या लौकिकात भर पडली आहे. डिसले म्हणाले की, सध्या मुलांना मोबाइलचे बरेच आकर्षण आहे. त्यामुळे याच गोष्टीचा वापर करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपण या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणासाठी करून घेतो. या उपक्रमामुळे शाळेत मुले आता जास्त व्यक्त होऊ लागली आहेत. डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गाना शिकवितात. मराठी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र व विज्ञान या विषयांच्या पाठय़पुस्तकातील धडे, कविता, पाठ मुलांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले. काही कवितांचे ध्वनिमुद्रण केले. धडय़ांसाठी स्वत: व्हिडिओफित तयार केली. त्यासाठी प्रत्येक कविता आणि धडय़ाला कोडिंग दिले. त्याचे कोड पुस्तकातही छापण्यात आले. हा कोड स्कॅन केल्यानंतर मुलांना डिजिटल स्वरूपात हे व्हिडिओ वर्गात पाहता येतात. तसेच विद्यार्थी मुले घरीदेखील सहजपणे अभ्यास करू शकतात. अशाप्रकारे या उपक्रमाचा कल्पकतेचा वापर केल्याने मुलांना शिक्षणाची गोडी लागल्याचे डिसले सांगतात.  हा उपक्रम तयार केल्यानंतर त्याचे दृश्य परिणाम यशस्वी दिसू लागल्यानंतर मागील वर्षी डिसले यांनी आपला हा प्रकल्प मायक्रोसॉफ्ट कंपनीला पाठविला होता. त्यानंतर जगभरातील सुमारे पाच हजार अभिनव प्रकल्पांचे मायक्रोसॉफ्ट कंपनीने संकलन केले. कंपनीने भारतातील शिक्षणाशी निगडित उपक्रम नवी दिल्लीत सादर केले. त्यानंतर देशभरातून आठ प्रयोगवीर शिक्षकांची कॅनडातील टोरोन्टो येथे होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी निवड करण्यात आली. यात रणजितसिंह डिसले यांचाही समावेश आहे. या परिषदेसाठी निवड झालेले इतर सात शिक्षक हे खासगी शाळांतील आहेत. डिसले हे एकमेव शिक्षक जिल्हा परिषद शाळेतील आहेत.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

  - http://guruvarykm.blogspot.in/

   या आपल्या Blog ला भेट द्या.....