twitter
rss

अवघड, सर्वसाधारण क्षेत्रातच आता बदल्या* 
- राजेंद्र पाटील
02.57 AM

_*शिक्षकांसाठी शासनाचे नवे धोरण जाहीर; शिक्षण क्षेत्रात होणार मोठे फेरबदल*_
कोल्हापूर - जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने बदल्याचे नवे धोरण आज जाहीर केले. त्यानुसार यापुढे शिक्षकांच्या अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांतील शाळांतच बदल्या होणार आहेत. या नव्या आदेशामुळे शिक्षकवर्ग कमालीचा हवालदील झाला असून, शिक्षणक्षेत्रात मोठे फेरबदल होणार आहेत.
जिल्हा परिषद सर्व विभागांत काम करणाऱ्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वी बदलीचे एकच धोरण होते. शिक्षक वर्गाची मोठी संख्या व इतर विभागापेक्षा शिक्षकांच्या कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन शासनाने शिक्षकांना केंद्रबिंदू मानून, त्यांच्या अडी-अडचणी विचारात घेऊन फक्त शिक्षकांसाठी जिल्ह्यांतर्गत बदल्याचे नवे सुधारित धोरण जाहीर केले आहे. या नव्या धोरणानुसार अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांत जिल्ह्यांतील शाळांची वर्गवारी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे तालुक्‍यातील सर्वसाधारण, तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अवघड क्षेत्रातील गावे व शाळा ठरविणार आहेत.
*अवघड क्षेत्र म्हणजे...*

जे गाव, शाळा तालुका मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोचण्यास सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे अवघड क्षेत्र म्हणून निश्‍चित केली जाणार आहेत.
*सर्वसाधारण क्षेत्र म्हणजे...*
अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे, शाळा सर्वसाधारण क्षेत्रात ओळखली जातील.
यांच्या बदल्या होणार
जिल्हा परिषद शाळांत काम करणारे प्राथमिक, माध्यमिक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे.
*हेच बदलीस पात्र*
ज्या शिक्षकांची सेवा अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण झाली आहे, असे शिक्षकच बदली अधिकारास प्राप्त राहतील, तर सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची सेवा दहा वर्षे पूर्ण झाली असेल, असे शिक्षक बदलीस पात्र ठरतील.
*यांना मिळणार बदलीतून सूट*
पक्षाघाताने आजारी कर्मचारी
अपंग कर्मचारी व अपंग मुलांचे पालक
हृदयशस्त्रक्रिया झालेले कर्मचारी
जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले कर्मचारी अथवा डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी
आजी-माजी सैनिक/जवानांच्या पत्नी किंवा विधवा
विधवा कर्मचारी  कुमारिका कर्मचारी
परितक्ता किंवा घटस्फोटित कर्मचारी
वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी
_‘सकाळ’मध्ये सर्वप्रथम वृत्त_
दैनिक ‘सकाळ’च्या ९ जानेवारी २०१७ च्या अंकात शासन शिक्षकांसाठी बदल्यांचे नवीन धोरण करणार असून, यापुढे अवघड व सर्वसाधारण या दोन क्षेत्रांतच शिक्षकांच्या बदल्या होतील, असे वृत्त प्रसिद्ध केले होते.
गुरुवर्य न्यूज
सुमीत मल्लिक नवे मुख्य सचिव*
By pudhari | Publish Date: Mar 1 2017
मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून सुमीत मल्लिक यांनी मंगळवारी  मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून पदभार स्वीकारला. राज्याच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याबरोबरच गुंतवणूक वाढीला महत्व देण्याचा निर्धार मल्लिक यांनी व्यक्त केला.

मल्लिक हे 1982 च्या तुकडीतील सनदी अधिकारी आहेत. ते एप्रिल 2018 पर्यंत मुख्य सचिवपदावर राहतील. त्यांनी प्रशिक्षणानंतर गडचिरोली जिल्हाचे उपविभागीय अधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरूवात केली. मल्लिक यांनी शिक्षण, कुपोषण, आरोग्य आदी क्षेत्रात महत्त्वाचे काम केले आहे. अमरावतीचे विभागीय आयुक्त असताना त्यांनी शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष पॅटर्न राबवला. हा पॅटर्न आजही सुमीत मल्लिक यांच्या नावाने ओळखला जातो. शिक्षण, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, वन आदी विभागात विविध पदांवर काम केल्यानंतर 2009 पासून ते सामान्य प्रशासन विभागात कार्यरत होते.

क्षत्रिय हे सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्य सचिवपदावर कोण बसणार याबाबत उत्सुकता होती. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, सेवाज्येष्ठतेच्या आधारावर मल्लिक यांच्या नावाला पसंती देण्यात आली.
  
गुरुवर्य न्यूज
 धडधड...पहिल्याच इंग्रजी पेपरची*
सकाळ वृत्तसेवा
02.39 AM

*सांगली जिल्ह्यात ४२ केंद्रांवर बारावीच्या परीक्षेला सुरवात; सात भरारी पथके*
सांगली - आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावरील बारावीच्या परीक्षांना आज सुरवात झाली. इंग्रजीच्या पहिल्या पेपरला केंद्रावर पोचण्यासाठी सकाळी नऊ वाजण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची लगबग अन्‌ पालकांची काळजी... अशा ‘परीक्षामय’ वातावरण होते.  जिल्ह्यातील ४२ केंद्रांवर ३७ हजार ५०३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. काही ठिकाणी बैठक व्यवस्था शोधण्यातला गोंधळ वगळता सर्वत्र पहिला पेपर सुरळीत पार पडला.  
परीक्षा केंद्रावर सकाळी साडेनऊपासून विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती. बहुतांश केंद्रांवर सकाळी दहा ते सव्वा दहाच्या सुमारात विद्यार्थांनी परीक्षेचे रिसिट पाहून आत सोडण्यात आले. केंद्रावर बैठक व्यवस्था पाहण्यासाठी लगबग सुरू होती. केंद्रावरील फळ्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश लिहिला होता; तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक सूचना फलकही लावले होते. विद्यार्थ्यांनी कॉपी अथवा गैरप्रकार केल्यास काय शिक्षा आहे, याचे ‘बोर्डा’कडून आलेले माहितीपत्रकही परीक्षा केंद्राच्या आवारात लावले होते. तत्पूर्वी विद्यार्थी आपापल्या मित्र-मैत्रिणीबरोबर हस्तांदोलन करून केलेल्या अभ्यासाची चौकशी करीत होते. परीक्षा केंद्रावर येण्यासाठी शहरातील विद्यार्थी उशिरा निघाले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच घर सोडावे लागले. लवकर आल्याने परीक्षा केंद्राबाहेर उभे राहून विद्यार्थिनी अभ्यास करीत होत्या. पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन नव्हते. त्यामुळे अनेकांच्या चर्चा व गप्पा सुरू होत्या. काही विद्यार्थ्यांना आलेल्या केंद्रावर आपला आसन क्रमांक न सापडल्याने
जवळच्याच दुसऱ्या केंद्रावर जावे लागल्याने काहीशी धावपळ झाली. परीक्षेला वर्गात जाताना नेहमी आपल्या बॅगा वर्गाबाहेर ठेवल्या होत्या.
गुरुवर्य न्यूज
 केवळ अठरा महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण विषय ऐच्छिक*
- संदीप खांडेकर
02.39 AM
*पदवी स्तरावर शारीरिक शिक्षण विषय महत्त्वाचा असला, तरी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ १८ महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक म्हणून घेण्याची सोय आहे. महाविद्यालयांतील अन्य विषय संख्येच्या तुलनेत शारीरिक शिक्षणविषयक शिक्षकांची संख्याही कमी आहे. क्रीडाविषयक सोयी-सुविधांचा प्रश्‍नही गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. शारीरिक शिक्षण विषय हा सक्तीचा केला तर खेळाडूंच्या भविष्याचे चित्र बदलू शकते. त्या अनुषंगाने शारीरिक शिक्षण विषयावर टाकलेला हा प्रकाशझोत...*
कोल्हापूर -
   शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १८ महाविद्यालयांत बीए भाग-१ ते बीए भाग-३ मध्ये शारीरिक शिक्षण विषय ऐच्छिक म्हणून शिकविला जातो. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचे योगदान वाढविणाऱ्या शारीरिक शिक्षण विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. त्यातही हा विषय ऐच्छिक म्हणून शिकविणाऱ्या महाविद्यालयांच्या तुलनेत आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करणारी महाविद्यालये वरचढ ठरताना दिसतात. याचा तपशीलवार अभ्यास केल्यास एकूणच शारीरिक शिक्षण विषय सक्‍तीचा करण्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे चित्र आहे. 
बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी स्तरावरील तीन वर्षांचा विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू होतो. खेळाडू म्हणून कामगिरी करणाऱ्यांना तीन वर्षांत पदकांची लयलूट करण्याची तयारी सुरू होते; मात्र पदवी स्तरावर खेळाडूंचा टक्काही कमी होत असल्याचा तज्ज्ञांचा सूर ऐकायला मिळतो. शारीरिक शिक्षण विषय घेऊन करिअरची वाट सोपी करण्यासाठी खेळाडूंचा प्रयत्न सुरू होतो. महाविद्यालयात क्रीडा सुविधा उपलब्ध असतील, तर खेळाडूंचा मार्ग सुलभ होतो. अन्यथा अथक परिश्रमाने त्यांना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करावे लागते. नेमकी तशी स्थिती महाविद्यालयांतील खेळाडूंच्या खेळातील प्रवासाकडे पाहिल्यास समजून येते.
शारीरिक शिक्षण हा महत्त्वाचा विषय असल्याने पदवी स्तरावर या खेळाची स्थिती काय, याबाबत प्रा. डॉ. पी. टी. गायकवाड यांनी नुकताच अभ्यास केला. पदवी स्तरावर शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक असणाऱ्या महाविद्यालयांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावर त्यांनी चिकित्सक अभ्यास करत शोधप्रबंध सादर केला. एक खेळाडू म्हणून त्यांनी केलेला हा अभ्यास शारीरिक शिक्षणाचे वास्तव मांडून या विषयासाठी नेमकेपणाने काय करायला हवे, याचाही उहापोह केला आहे.
विद्यापीठ कार्यक्षेत्रात पदवी स्तरावरील अठरा महाविद्यालयांपैकी फक्‍त आठ महाविद्यालयांमध्येच प्रथम वर्षापासून ते तृतीय वर्षापर्यंतचे आठ पेपर शिकविण्याची सोय आहे. उर्वरित दहा महाविद्यालयांत फक्‍त प्रथम व द्वितीय वर्षातील तीनच पेपर शिकविले जातात. शारीरिक शिक्षण विषयाच्या तुलनात्मक अभ्यासासाठी निश्‍चित केलेल्या बत्तीस पैकी केवळ तीन महाविद्यालयांत मैदानविषयक समाधानकारक अशी स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाच, सांगलीतील नऊ, तर सातारा जिल्ह्यातील चार महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण अभ्यासला जात असला, तरी केवळ आठ महाविद्यालयांत तो चांगल्या पद्धतीने शिकविण्यात येतो.
- शारीरिक शिक्षण हा ऐच्छिक म्हणून शिकविला जातो.
- बीए भाग-१ ते बीए भाग -३ करिता ११०० गुणांची परीक्षा घेतली जाते.
- पुणे, अमरावती, औरंगाबाद, नांदेडमधील विद्यापीठांव्यतिरिक्‍त अन्यत्र कोठेही पदवी स्तरावरील सर्व तीनही वर्षांत शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक म्हणून घेण्याची सोय नाही.
*नागेशकर यांचा पुढाकार*
क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या पुढाकाराने विद्यापीठाच्या स्थापनेपासून शारीरिक शिक्षण विषय पदवी स्तरावरील प्रथम वर्षांतील विद्यार्थ्यांसाठी सक्‍तीचा करण्यात आला व त्यासाठी दहा गुणांची शारीरिक शिक्षण परीक्षा अनिवार्य करण्यात आली. ती परीक्षा आजही घेतली जाते.
गुरुवर्य न्यूज