🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
🍍🍅 *आरोग्य-MANTRA* 🍋🍉
*भाग* -2⃣7⃣0⃣
🍛 _*जेवण झाल्यावर 'या' गोष्टी टाळाच...!*
हल्ली धावपळ वाढल्याने सर्वच लोक रोज जेवण करतात आणि आपापली वेगवेगळी कामे करायला लागतात. मात्र, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वेगवेगळ्या शारिरीक समस्या टाळण्यासाठी जेवण झाल्यावर काय करावे आणि काय करू नये, असे काही नियम आहेत. त्यातीलच जेवणानंतर लगेच कोणत्या गोष्टी करू नये, त्याबद्दल जाणून घेऊयात...
🛌 _*लगेच झोपू नका*_ : अनेकांना जेवण झाल्या-झाल्या झोपण्याची सवय असते. मात्र, हे चुकीचे आहे. कारण अन्नाचे पचन व्हायला काही वेळ लागतो, त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे गॅस आणि आतड्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यासाठी थोडा वेळ घ्या.
❌ _*धूम्रपान टाळा*_ : अनेकांना जेवल्यावर लगेच सिगारेट हवी असते. पण असे करणे जास्त घातक आहे. सिगारेटमुळे हृदय आणि श्वसनासंबंधी आजार होतात. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणे हे जास्त धोकादायक असल्याची माहिती डॉक्टर देतात. जेवल्यानंतर लगेच सिगरेट प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोकाही मोठ्याप्रमाणावर वाढतो.
🛁 _*लगेच आंघोळ नको*_ - आंघोळ करताना पाण्यामुळे शरिरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे यामुळे टाळावे.
🍊🍌 _*लगेच फळं खाऊ नये*_ - जेवणाबरोबरच तुम्ही फळं खात असाल तर या फळांचं पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळं पोटामध्येच चिटकून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जेवण झाल्यावर एका तासाने फळे खाल्ली पाहिजेत.
☕ _*चहा टाळा*_ - चहापत्तीमध्ये सर्वाधिक आम्लाचं प्रमाण असतं, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळा.
🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.....
http://guruvarykm.blogspot.in/
या आपल्या Blog ला भेट द्या .